Posts

Showing posts with the label मंद वारा

Shukratara Mand Vara Lyrics/ शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातूनी

Image
Lyrics: Mangesh Padgaonkar Music: Shrinivas Khale Singer: Arun Date, Sudha Malhotra Bhavgeet, Love Song शुक्रतारा, मंद वारा चांदणे पाण्यातुनी चंद्र आहे, स्वप्‍न वाहे धुंद या गाण्यातुनी आज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहा तू अशी जवळी रहा मी कशी शब्दांत सांगू भावना माझ्या तुला? तू तुझ्या समजून घे रे लाजणार्‍या या फुला अंतरीचा गंध माझ्या आज तू पवना वहा तू असा जवळी रहा लाजर्‍या माझ्या फुला रे गंध हा बिलगे जीवा अंतरीच्या स्पंदनाने अन्‌ थरारे ही हवा भारलेल्या या स्वरांनी भारलेला जन्म हा तू अशी जवळी रहा शोधिले स्वप्‍नात मी ते ये करी जागेपणी दाटुनी आलास तू रे आज माझ्या लोचनी वाकला फांदीपरी आता फुलांनी जीव हा तू असा जवळी रहा